एप्रिल महिन्याच हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच !

बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे वक्तव्य

by Team Satara Today | published on : 01 May 2025


मुंबई : ‘लाडकी बहीण योजना महायुती सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. एप्रिल महिन्याच हप्ता हा माता-भगिनी आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच वितरित होणार आहे’, असं वक्तव्य करत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हफ्त्यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण कालच साजरा करण्यात आला. याच अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. 

मात्र अक्षय्य तृतीयेलाही एप्रिल महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर आलेला नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींची निराशा झाली आहे. अशातच आज मंत्री अदिती तटकरे यांनी बोलताना एप्रिल महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकर जमा होणार असं सांगितलं. पण नेमका कधी खात्यात जमा होणार हे सांगितलं नसल्याने लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार हेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसतंय.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नका
पुढील बातमी
पहलगाम नव्हे तर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती 'ही' ठिकाणे

संबंधित बातम्या