त्रिपुटीतील एकाला बेदम मारहाण; तीन जणांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 23 February 2026


सातारा : कोरेगाव तालुक्यातील त्रिपुटी येथे राहणारे रोहित विजय शेडगे (वय ३२) यांना तीन जणांनी बेदम मारहाण केली आहे. यामध्ये रोहित यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर,बरखडीवर मारून दुखापत करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश वसंत वाघमारे, वसंत गोविंद वाघमारे सूर्यकांत संपत वाघमारे यांनी रोहित शेडगे याला तू माझ्या वडिलांना उलटे का बोललास ते तुझ्यापेक्षा मोठे आहेत, तू त्यांची माफी माग असे म्हणत वडिलांची माफी मागण्यास सांगितले. याला नकार दिल्याने तिघांनी आपापसात संगणमत करून हाताने आणि लाथांनी मारहाण केले आहे. या मारहाणीत त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर आणि बरखडीवर दगडाने मारहाण करून दुखापत करण्यात आले आहे ही घटना दि २२ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आहे.घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार साबळे करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डंपरच्या हप्त्याचे पैसे न भरता फसवणूक केल्याप्रकरणी एकावर दाखल
पुढील बातमी
सातारा पालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा राजवाडा येथून शुभारंभ; संत गाडगेबाबा जयंती निमित्त पदाधिकाऱ्यांच्या हातात झाडू

संबंधित बातम्या