सातारा : सातारा शहरात जुगारप्रकरणी तीन जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. ८ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शहरातील मल्हार पेठ परिसरात जुगार घेताना सचिन साहेबराव निकम राहणार सोमवार पेठ सातारा हे आढळून आले. त्यांच्याकडून ७८० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत, शहरातील पोवई नाका ते वाढे फाटा रस्त्यावर असलेल्या एका बंद टपरीच्या आडोशाला प्रमोद पांडुरंग कांबळे (रा. खेड, ता. कोरेगाव, जि. सातारा) हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 720 रुपये आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
तिसऱ्या घटनेत, दि. ८ रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील राजधानी टॉवर्सच्या पार्किंगमध्ये अवैधरित्या जुगार घेताना प्रमोद नरसिंह पोतदार (रा. शाहूपुरी, सातारा) हे आढळून आले त्यांच्याकडून ८५० रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.