पुण्यात भीषण अपघात!

दोघांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

by Team Satara Today | published on : 03 October 2024


पुणे : पुण्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रिक्षाला भरधाव कंटेनरने उडवलं त्यानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे. या भीषण अपघाताच्या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. 

पुणे सोलापूर रोडवरील सिद्धिविनायक पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली आहे. या भीषण घटनेनंतर पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारांसाठी तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, तर या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
१० तास वाट पाहूनही मुख्यमंत्री शिंदेनी भेट नाकारली!
पुढील बातमी
भाजपच्या बैठकीत जोरदार खडाजंगी

संबंधित बातम्या