सातारा : सातारा तालुक्यातील पवळेश्वरनगर येथून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सानिका आदित्य शिरतोडे ही २0 मार्च रोजी सकाळी सहाच्या सुमारास अंघोळीला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली; मात्र ती परत आली नाही. तिच्या वडिलांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबतचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.
सातारा तालुक्यातील पवळेश्वरनगर येथून युवती बेपत्ता
by Team Satara Today | published on : 23 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा