सातारा : जुगार प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेंद्रे ता.सातारा येथे जुगार प्रकरणी पोलिसांनी शिवाजी केशव जावळे (वय 55, रा. वेचले ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रोख 1950 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा