पाण्याच्या मोटरची चोरी

by Team Satara Today | published on : 19 December 2024


सातारा : पाण्याच्या मोटरची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दरे बु., ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने विहिरीतील पाण्याची मोटर चोरुन नेली. ही घटना दि. 24 नोव्हेबर ते 1 डिसेंबर या कालावधीत घडली आहे. 15 हजार रुपये किंमतीची मोटर असून चोरट्यांनी परिसरात धुडगूस घातला आहे. याप्रकरणी महेश आनंदराव निकम (वय 41, रा. दरे बु.) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता
पुढील बातमी
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या