डबेवाडी येथे गणेशोत्सव मंडळांच्या डॉल्बीवर कारवाई

सातारा तालुका पोलिसांची कारवाई; मंडळ अध्यक्ष, ट्रॅक्टर चालक व डॉल्बी मालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 27 August 2025


सातारा : डबेवाडी, तालुका सातारा येथे दोन गणेशोत्सव मंडळांनी जोरजोरात डॉल्बी लावून ट्रॅफिक जाम केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. मंडळ अध्यक्ष, ट्रॅक्टर चालक व संबंधित डॉल्बी मालक यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून संबंधित डॉल्बी यंत्रणा जप्त करण्यात आली आहे.

आझाद हिंद सांस्‍कृतिक मंडळ डबेवाडीचे अध्यक्ष दर्शन दयानंद माने, डीजे मालक प्रतिक सुनील माने, ट्रॅक्‍टर चालक अनिकेत संजय माने यांच्यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा गुन्‍हा काळेश्वरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुलदीप धर्मेंद्र माने, डीजे मालक मयुरेश मंगेश मोरे यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईच्या माध्यमातून डॉल्बी मालकांना सातारा पोलिसांनी जणू संदेश दिला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी डॉल्बीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याच्या सख्त सूचना दिल्या आहेत.

बुधवारी सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात मंगळवारी गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका सुरू होत्या. डबेवाडी येथे दोन गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी यंत्रणा मर्यादेपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात लावून सातारा-सज्जनगड रस्त्यावर ट्रॅफिक जाम केल्याचा दूरध्वनी नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. त्यानुसार सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जाऊन तेथे पाहणी केली असता संबंधित तक्रारी मध्ये तथ्य आढळून आले.

यानंतर पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या सूचनेप्रमाणे संबंधित मंडळाचे अध्यक्ष, डॉल्बी मालक व ट्रॅक्टर चालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून डॉल्बी सिस्टीम सह वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, पोलीस हवालदार राजू शिखरे, मनोज गायकवाड, पंकज ढाणे, दादा स्वामी, किरण निकम, प्रदीप मोहिते, संदीप पांडव, शंकर गायकवाड यांनी सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एडवोकेट राजीव अत्रे यांचे निधन
पुढील बातमी
फलटणमधील टोळी दोन वर्षांसाठी तडीपार

संबंधित बातम्या