कानपूर : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या दिवशी अतिरिक्त वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे बांगलादेशला झटपट बाद करण्याचं आव्हान होतं. पण मोमिनुल हकने एका बाजून चिवट झुंज दिली. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या बाजूने विकेट घेण्याशिवाय पर्याय नव्हता आणि झालंही तसंच. मोमिनुल हक शेवटपर्यंत नाबाद 107 धावांवर राहिला. तर दुसऱ्या बाजूने 7 विकेट पडल्या. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिली विकेट मिळवून दिली. मुशफिकुर रहमानला 11 धावांवर असताना त्रिफळाचीत केलं. त्यानंतर एक एक करत इतर फलंदाजांना बाद करण्यात टीम इंडियाला यश आलं. लंच ब्रेकनंतर तीन गडी झटपट बाद केले आणि बांगलादेशचा खेळ 233 धावांवर संपुष्टात आला.
भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर मोहम्मद सिराज, आर अश्विन आणि आकाश दीपने प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर रवींद्र जडेजाला एक गडी बाद करण्यात यश आलं. बांगलादेशचा खालिद अहमद हा रवींद्र जडेजाचा कसोटी क्रिकेटमधील 300 वा बळी ठरला. त्याच्या विकेटसह बांगलादेशचा कानपूर कसोटीतील पहिला डाव संपुष्टात आला. बांगलेशकडून झाकीर हसन आणि खालिद अहमद यांना आपलं खातंही खोलता आलं नाही. शदमन इस्लामन 24, नजमुल होसेन शांतो 31, मुशफिकुर रहमान 11, लिटन दास 13, शाकीब अल हसन 9, मेहिदी हसन मिराज 20, तैजुल इस्लाम 5, हसन मेहमुद 1 या धावसंख्येवर बाद झाले.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालेद अहमद.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |