सातारा : येथील अनंत इंग्लिश स्कूल जवळील आयडीबीआय बँकेसमोरील चौकात आठ जण दि. १७ रोजी जमाव जमवून बसले होते. बेस बॉलचे दांडे, दातऱ्याचा चाकू घेवून दहशत माजवण्यासाठी आरडाओरडा करत होते. त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
धीरज जयसिंग ढाणे (रा. चिमणपुरा पेठ, सातारा), सौरभ राजू खरात (रा. दिव्यनगरी, सातारा), साद अय्याज बागवान (रा. शनिवार पेठ), प्रसन्न नारायण दिक्षीत (व्यंकटपुरा पेठ), युवराज शिवाजी मुरारी (रा. मंगळवार पेठ), ऋषभ राजेंद्र जाधव (रा. रविवार पेठ) व अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार घोडके तपास करत आहेत.