सातारा : म्हसवे गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या राजस्थान ढाब्यासमोर ३० डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत बेशुद्ध अवस्थेत पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. गणेश अंबर गुंड (वय ३८ रा. वडगाव,गुंड ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे याबाबत आकाश संदिपान चवरे (वय ३१ रा. लातूर) यांनी तालुका पोलिसात खबर दिली असून अधिक तपास सहायक फौजदार माने करत असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली आहे.
म्हसवे गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगत दारूच्या नशेत बेशुद्ध अवस्थेत पडल्याने एकाचा मृत्यू
by Team Satara Today | published on : 01 January 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा