गेल्या काही महिन्यांमध्ये भारत सरकारने नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आत्मसमर्पण किंवा सुरक्षा दलांच्या गोळीचे शिकार हे दोनच पर्याय नक्षलवाद्यांच्या समोर ठेवले आहेत. तसेच देशातील नक्षलवाद मार्च 2026 पर्यन्त संपवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान छत्तीसगडमध्ये तब्बल 208 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
आज छत्तीसगडमध्ये तब्बल 208 नक्षलवाद्यांनी आत्म समर्पण केले आहे. मागील तीन दिवसांत एकूण 405 नक्षलवाद्यांनी समर्पण केले आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील माड क्षेत्र नक्षलवाद्यांचा गड समजला जातो. या भागातील 208 नक्षलवाद्यांनी बस्तर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात आत्मसमर्पण केले आहे. यावेळेस छत्तीसगडचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते.
छत्तीसगडमध्ये गेल्या तीन दिवसांत तब्बल 405 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सरकारच्या नक्षलवाद मुक्त भारत मोहिमेला मोठे यश प्राप्त झाले आहे. गुरुवारी 170 तर बुधवारी 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये 110 महिला आणि 98 पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये अनेक असे नक्षलवादी आहेत जे कमांडर पदावर नक्षलवाद्यांचे नेतृत्व करत होते.
केंद्र सरकार आणि सुरक्षा दलांना नक्षलवादाच्या विरोधात मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, आज सुमारे १७० नक्षलवाद्यांनी प्रशासनासमोर आत्मसमर्पण केले. इतक्या मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे गृहमंत्र्यांनी हा दिवस ऐतिहासिक असल्याचे वर्णन केले आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याचे वचन पुन्हा दिले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाबाबत इंस्टाग्रामवर एक महत्त्वाची पोस्ट पोस्ट केली. त्यांनी लिहिले की, “नक्षलवादाच्या विरोधातल्या आपल्या लढाईतील हा एक ऐतिहासिक दिवस आहे. आज छत्तीसगडमध्ये १७० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. काल राज्यात २७ जणांनी आत्मसमर्पण केले. काल महाराष्ट्रात ६१ नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतले.
अमित शाह यांनी लिहिले की, “गेल्या दोन दिवसांत एकूण २५८ लढाऊ प्रशिक्षित डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांनी हिंसाचाराचा त्याग केला आहे.” भारतीय संविधानावर विश्वास ठेवून हिंसाचाराचा त्याग करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे मी कौतुक करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या या समस्येचे निर्मूलन करण्यासाठीच्या अथक प्रयत्नांमुळे नक्षलवाद शेवटचा श्वास घेत आहे याचा हा पुरावा आहे.”