विविध योजनांचा लाभ घेण्याचे वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जमाती विकास महामंडळाचे आवाहन

by Team Satara Today | published on : 25 January 2025


सातारा : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामडंळातंर्गत पै. कै. मारुती चव्हान - वडार आर्थिक विकास महामंडळ व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ,तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व  भटक्या जमाती महामंडळ सातारा या कार्यालयामार्फत १ लाख रुपये थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये १ लाख थेट कर्ज महामंडळामार्फत दिले जाणार आहे. लाभार्थीनी रु. २०२५/- चा नियमित ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीनां व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकीत हप्त्यावर द.सा.द.शे ४ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल.

अधिक माहितीसाठी महामंडळाचे सातारा जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ,बी बिल्डींग ,सर्व्हे नं २२अ, जुनी एम. आय.डी.सी रोड, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डानपुलाजवळ ,सातारा, दूरध्वनी क्रं. ०२१६२ – २९५०६८ येथे सपंर्क साधावा. तरी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष"

संबंधित बातम्या