हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मोळाचा ओढा येथील एकावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 08 April 2026


सातारा :  जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या व्यक्तीने आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उपविभागीय दंडाधिकारी, सातारा यांनी दि ५ ऑगस्ट २०२४ रोजी यश सुभाष साळुंखे (वय २२, रा. मोळाचा ओढा,सातारा) या आरोपीस दोन वर्षांसाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले होते. मात्र, यश साळुंखे याने हद्दपार प्राधिकरण तसेच पोलीस अधीक्षक, सातारा किंवा महाराष्ट्र शासन यांची कोणतीही लेखी परवानगी न घेता आदेशाचा भंग करून जिल्ह्यात वावरत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष घाडगे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक मोहिते करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरातील नवीन एमआयडीसी परिसरात मोटारसायकलच्या धडकेत एक पादचारी गंभीर जखमी
पुढील बातमी
सातारा एमआयडीसीतील लोकमंगल विद्यामंदिरात आज 21 वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन

संबंधित बातम्या