भुईमुग पिकाच्या प्रमाणित बियाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 10 December 2025


सातारा : राष्ट्रिय खादयतेल अभियान तेलबिया  हे खादयतेलांच्या आयातीवरील भारताचे अंवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवून तसेच शेतक-यांचे उत्पन्न सुधारून आत्मनिर्भरतेकडे जाण्यासाठी तयार केले आहे. सदर अभियानांतर्गत पिकांची उत्पादकता वाढ व सुधारित वाणांच्या प्रसारासाठी उन्हाळी हंगाम 2025-26 करिता भुईमुग पिकासाठी हेक्टरी 150 किलो (रक्कम रू.114/किलो) शेंगा प्रमाणित बियाणे केंद्र शासनाने निवड केलेल्या जिल्हयांना 100% अनुदानावर वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये उन्हाळी भुईमुग पिकाचे 100% अनुदानावर प्रमाणित बियाणांचा लाभ सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावयाचा आहे. यासाठी प्रती लाभार्थी किमान 0.20 हेक्टर व कमाल 1 हेक्टर मर्यादित लाभ देय आहे.

शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांचा भुईमुगासाठी 20 किलो किंवा 30 किलो याप्रमाणे बियाणाचा पॅकिंग साईज आहे. शेतकऱ्यांना बियाण्याच्या पॅकिंग साईज नुसार प्रमाणित बियाणे वितरीत करण्यात येईल. त्यामुळे क्षेत्रानुसार आवश्यक बियाण्यापेक्षा पॅकिंग साईज नुसार अधिकचे बियाणे परीगणित होत असल्यास याकरिताची रक्कम शेतकऱ्यांनी स्वहिश्श्याने भरावी लागेल. उन्हाळी भुईमुग पिकाच्या बियाणांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer AgrillLogin या संकेतस्थळावर प्रमाणित बियाणे वितरण, प्रात्याक्षिके, फलेक्झि घटक औषधे आणि खते या टाईल अंतर्गत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अर्ज सादर करण्यासाठी शेतक-यांची Agristack वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. सातारा जिल्ह्यास 750 क्विंटल उन्हाळी भुईमुग बियाणेचे वितरणाचा लक्षांक कृषि आयुक्तालयाने मंजूर केलेला आहे. लाभार्थी निवड लक्षांकाच्या अधीन राहून प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे या घटकासाठी जास्तीत जास्त इच्छूक शेतकरी बांधवांनी अर्ज करावेत आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भुरटे लोक पक्ष सोडून गेले : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; ऐरोलीमध्ये मशालीला घेऊन तुतारी वाजवा
पुढील बातमी
जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या शिक्षक निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर; जानेवारीच्या अंतिम रविवारी पुरस्कार प्रदान करणार

संबंधित बातम्या