टपाल विभागावरील विमा प्रतिनिधी नेमणुकीसाठी इच्छुकांनी 10 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत

by Team Satara Today | published on : 27 July 2023


सातारा : टपाल जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजने अंतर्गत असणाऱ्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणुक प्रवर अधिक्षक डाकघर, सातारा विभाग सातारा 415001 यांच्या मार्फत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिनांक 10 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज पाठवावे. अर्ज पाठविताना उमेदवाराने आवश्यक कागद पत्रे, जन्म तारखेचा दाखला, शैक्षणीक पात्रतेची आवश्यक कागदपत्रे तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्याबाबतची कागदपत्रे पाठवावी.

अधिक माहितीसाठी वरिष्ठ अधिक्षक डाकघर सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालयामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन

संबंधित बातम्या