सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीने ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, आ. सचिन पाटील, माजी आ. प्रभाकर घार्गे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, अनिल देसाई, प्रभाकर देशमुख, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, प्रमोद शिंदे, शिवरुपराजे खर्डेकर, पृथ्वीराज गोडसे, मनोज देशमुख, श्रीनिवास शिंदे यांच्या उपस्थितीत 200 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
गेल्या दोन दिवसांपासून पक्ष कार्यालयात निवडणुकीचा सिलसिला सुरु होता. मुलाखत देण्यासाठी इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी पक्ष कार्यालयात मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयातही उमेदवारीसाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारपर्यंत 131 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब पाटील, दीपक पवार, गोरखनाथ नलवडे, नरेश देसाई, संजना जगदाळे, समिंद्रा जाधव, राजकुमार पाटील यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या.