सातारा : लक्ष्मीटेकडी सदरबझार सातारा येथील वस्ताद मैदानाजवळ पोलिसांसमक्ष भांडणे करताना आढळून आल्याने सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवारी (दि. २५) रात्री सात वाजण्याच्या सुमारास हा हा भांडणाचा प्रकार घडला. रोहन अन्वर व सुरज पवार (दोघेही, रा. सदरबझार, सातारा) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत. पोलिस कॉ. आशिकेष डोळस यांनी याबाबत सातारा शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिस हवालदार सावंत या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.