सातारा : दरवर्षी कार्तिक महिन्यात दीपावली सणानंतर सातारा येथील कासट परिवाराच्या श्री सत्यनारायण मंदिरात अन्नकोट अर्थात 56 भोग नैवेद्य दाखवून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा दरम्यान आयोजित केलेल्या काकड आरतीतील हा एक 56 भोग उपक्रम संपूर्ण देशातच मोठ्या उत्साहाने साजरा होतो.
सातारा येथील खंडाळी परिसरातील कासट परिवाराच्या सत्यनारायण मंदिरातील सत्यनारायण देवास विशेष अलंकार घालून गुलाब पुष्पांचे हार घालण्यात आले होते, तसेच देवापुढे विविध तिखट गोड पदार्थांची मेजवानीच अक्षरशः मांडण्यात आली होती. विविध प्रकारचे लाडू ,बर्फी, पेढे, सुतरफेणी, बालुशाही, श्रीखंड, बासुंदी, विविध प्रकारच्या मिठाई यामध्ये ड्रायफ्रूट्स तसेच तिखट पदार्थांमध्ये शेव, बुंदी, फरसाण, पापडी, गाठी, चकली, यासह विविध असे चविष्ट पदार्थही मांडण्यात आले होते. यानिमित्त मंदिरात दुपारी बारा वाजता सत्यनारायणाची महाआरती करून सर्वांना तीर्थ, तुळसीपत्र व प्रसाद वितरण करण्यात आला. या उपक्रमामध्ये कासट परिवाराचे वतीने शकुंतला कासट, दिलीप कासट, राजेंद्र कासट, श्रीनिवास कासट, जगदीश कासट, आनंद कासट, धीरज कासट, हरीश कासट, संजय कासट, पियुष कासट, गौरव कासट, दीप कासट, हरिनारायण कासट व सर्व कासट परिवारातील स्नुषा मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या, त्यानंतर या सर्व परिवाराच्यावतीने मान्यवरांना महाप्रसाद वितरित करण्यात आला.