सातारा : भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाच्या निमित्ताने आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल सातारा शहरामध्ये आयोजित कार्यक्रमात नामदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे उपस्थित राहिले आणि त्यांनी स्थापना दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. स्थापनेनंतरचा खडतर काळ आणि आत्ताच्या काळामध्ये केलेली कामे याविषयी यावेळी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचा झेंडा उभारण्यात येवून त्याला वंदन करण्यात आले. यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारत माता, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीची स्थापना, इतिहास आणि कार्य विस्तार त्याचप्रमाणे 2014 पासून भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले काम तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले काम याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. दरम्यान, सर्वांच्या बरोबर बसून सर्व मान्यवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले मार्गदर्शन पाहिले.
भारतीय जनता पार्टीचे संघटन पर्व सध्या सुरू आहे. यामध्ये प्राथमिक सदस्य अभियान राबवले गेले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्याचे उद्दिष्ट दिले होते. ते पूर्ण झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून प्राथमिक सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम, भा ज पा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक धनंजय जांभळे, सुनील काळेकर, महिला मोर्चा सातारा शहर अध्यक्ष रीना भणगे, वैष्णवी कदम, रोहिणी क्षीरसागर, संगीता जाधव, अंजली त्रिंबके, नितीन कदम, प्रवीण शहाणे, चंदन घोडके, विक्रम बोराटे अविनाश खर्शीकर, डॉ. सचिन साळुंखे, डॉ. सचिन भोसले, कुणाल मोरे, मंगेश गोगावले, अमोल टंगसाळे, दीपक क्षीरसागर, गजेंद्र ढोणे, युवराज मोरकर, विकास बनकर, सनी शिंदे, नितीन बर्गे आणि पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.