सातारा : देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च 2026-26 करिता विदयार्थ्यांकडून जाहिरातीदवारे अर्ज करण्यास 30 जानेवारी 2026 अखेर मुदतवाढ मिळाली आहे.
देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसुचित जातीच्या विदयार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती या योजनेसाठी सन 2025-26 करिता विदयार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. तथापि शेक्षणिक संस्थामधील सन २०२५-२६ मधील प्रवेश प्रक्रिया अदयाप पूर्ण झालेली नाही. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेत स्थळाला भेट देउन अर्ज डाउनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ०६.१५ वाजेपर्यंत किंवा समक्ष "समाजकल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे-४११००१" येथे यांचेकडे सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.