पंजाब : पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अमृतसरहून सहरसा येथे जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला अचानक आग लागली. ज्यामुळे अंबालापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या सरहिंद स्थानिकाजवळ रेल्वे पोहचताच ही आग लागली. एका डब्यातून धूर येत असल्याचे पाहून प्रवाशांनी तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. रेल्वे चालकांनेही चालकानेही तात्काळ ट्रेन थांबवली, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सकाळी ७:३० च्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेची आग आटोक्यात आणली जात आहे. आग आटोक्या आल्यानंतर रेल्वेची स्थिती तपासली जाईल. खराब झालेल्या डब्याची तपासणी केल्यानंतर, ट्रेन लगेच तिच्या गंतव्यस्थान असलेल्या सहरसाच्या दिशेने रवाना होईल. रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि जीआरपी पथकांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि प्रवाशांना सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत.
आगीची बातमी पसरताच, प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. पण रेल्वे आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या तत्पर कृतीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांची तत्परता आणि अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
भारतीय रेल्वेने ट्विटरवर या घटनेची माहिती दिली, आयआरने केलेल्या पोस्टनुसार, आज सकाळी (सकाळी ७:३० वाजता) सरहिंद स्थानकावर ट्रेन क्रमांक १२२०४ (अमृतसर-सहरसा) च्या एका डब्यात आग लागली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आणि आग विझवण्यात आली. कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसून आग लागलेला डबा रेल्वेपासून वेगळा करण्यात आला आहे. तसेच आगीचे कारण तपासले जात आहे.