वाई पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात

by Team Satara Today | published on : 05 July 2025


सातारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाई पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडले आहेत.

याबाबत सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Aअउइ) वाई पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बिपीन बाळकृष्ण चव्हाण यांच्यासाठी पोलीस हवालदार उमेश दत्तात्रय गहीण यांना सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदारांकडून 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

तक्रारदारांविरुद्ध दाखल होणारा सामूहिक बलात्काराचा गुन्हा टाळण्यासाठी चव्हाण व गहीण या दोघांनी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. ती तडजोडीअंती 15 हजार रुपये निश्चित झाली. 4 जुलै 2025 रोजी वाई पोलीस ठाण्याच्या आवारात केलेल्या पडताळणी कारवाईत उमेश गहीण यांनी बिपीन चव्हाण यांच्यासाठी लाचेची 15 हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी तक्रारदाराला धमकावून आणि मारहाण करून लाच देण्यासाठी प्रवृत्त केल्याचे तसेच तक्रारदारांना सांगेल तेव्हा साक्षीदार होण्यासही सांगितल्याचे समोर आले आहे.

पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे, पोलीस हवालदार नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश राजपुरे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे पुढील तपास करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये : जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
अजिंक्य बझार परिसरातून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या