सातारा : उदयनराजेंचे मला जर आव्हान असते, तर महायुतीने आतापर्यंत उमदेवार जाहीर केला असता. ज्याअर्थी अजूनही उमेदवार जाहीर नाही, त्याअर्थी त्यांना अजून विश्वास नाही. ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. साताराचा विकास पुढे नेण्यासाठी कोण पात्र आहे, हे जनता ठरवेल, असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
सातारा लोकसभेसाठी इंडिया आघाडीतून शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली. याअनुषंगाने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शशिकांत शिंदे म्हणाले, राज्यात सध्या सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र असंतोष आहे. सातारा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र, प्रशासन काही करत नाही. याशिवाय बेरोजगारी, पर्यटन, आयटी हब असे अनेक प्रश्न आहेत. अजेंड्यात अशा अनेक बाबी समाविष्ट असतील.
पाच वर्षांपूर्वी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाचा उमेदवार विजयी झाला. त्यावेळी शरद पवार सातारला निघाले होते, परंतु माझ्या पराभवाचे वृत्त समजताच त्यांनी तो दौरा रद्द केला होता. हे माझ्यावर उपकार आहेत. आज अनेक जण पक्ष सोडून जात असले, तरी मी निष्ठावंत राहिलो असून, राजकारणाच्या शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासाेबत राहणार आहे.
ज्यावेळी पक्षासमोर संघर्ष करण्याचे मोठे आव्हान होते, त्यावेळी शरद पवार यांनी माथाडी कामगाराच्या मुलाला व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देऊन लोकसभेचे नेतृत्व करण्यासाठी धाडले. हा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही शशिकांत शिंदे यांनी नमूद केले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |