म्हसवड पालिकेत समविचारी आघाडीबरोबर युती; राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत निर्णय, अभयसिंह जगताप यांची माण खटाव विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी निवड

by Team Satara Today | published on : 08 November 2025


सातारा  : सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आज माण खटाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन सातारा येथे पार पडली.

या  बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांची माण खटाव विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. माण खटाव विधानसभा मतदारसंघाची सर्वस्वी जबाबदारी अभयसिंह जगताप यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्नशील राहावे,  असे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

तसेच या बैठकीत म्हसवड नगरपालिका निवडणूक लढविणे विषयी चर्चा करण्यात आली त्या चर्चेनुसार समविचारी लोकांशी आघाडी करून निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्याशी चर्चा करण्यात आली. 

सदर बैठकीस जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील,म्हसवड मा. नगराध्यक्ष विलासराव माने, प्रदेश प्रवक्ते प्रशांत वीरकर, महिला प्रदेश उपाध्यक्ष  कविताताई म्हेत्रे, माजी सभापती नितीन राजगे, माजी नगराध्यक्ष सागर पोळ, नगरसेवक विशाल पोळ, विजय जगताप, अंकुश गाढवे, अरूण सावंत,  पिंटू लिंगे, सरपंच योगेश जाधव, महेश खाडे, हिंमतराव देशमुख, दत्तात्रय काटकर, माजी  सरपंच महादेव जाधव, किरण खलवे इ. उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुलतानपुर येथील वाई औद्योगिक वसाहतीमध्ये कचर्‍यामुळे नागरिक हैराण; परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य
पुढील बातमी
साताऱ्यात बांगलादेशीवासियांचे अवैध वास्तव्य; शोध मोहीम राबवण्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांची मागणी

संबंधित बातम्या