सूरज चव्हाणला केदार शिंदेंनी दिली खास भेटवस्तू

by Team Satara Today | published on : 21 October 2024


सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता आला. सूरज चव्हाण विजेता झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला. सूरज चव्हाणने त्याचा साधेपणा, खरा स्वभाव आणि टास्कमध्ये दिलेलं १०० टक्के योगदान यामुळे त्याने बिग बॉसच्या विजेतेपदावर मोहोर उमटवली. सूरजला बिग बॉसमध्ये सहभागी करुन घेण्यास कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदेंचंही मोठं योगदान आहे. बिग बॉसनंतरही केदार शिंदे आणि सूरज चव्हाणचं खास नातं बघायला मिळतंय. याचाच अनुभव नुकत्याच एका व्हिडीओत आला.

केदार शिंदे-सूरज चव्हाणची खास भेट :

केदार शिंदेंनी सूरज चव्हाणसोबतचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत सूरजच्या खांद्यावर हात ठेऊन केदार शिंदे येताना दिसतात. पुढे केदार शिंदे सूरजला त्यांच्या घरी घेऊन जाताना दिसतात. सूरज अत्यंत आदराने आणि प्रेमाने केदार शिंदेंना मिठी मारतो. पुढे केदार शिंदे सूरजला एक खास गिफ्ट देतात. या गिफ्टमध्ये एक बॉक्स असतो. केदार शिंदे तो बॉक्स उघडून सूरजसमोर ठेवतात. पुढे केदार शिंदे सूरज चव्हाणला त्या गिफ्टचा अर्थ समजावताना दिसतात.

केदार शिंदेंचं सूरजला खास गिफ्ट :

केदार शिंदेंनी सूरजला खास गिफ्ट दिलं. या गिफ्टमध्ये एका बॉक्समध्ये विठ्ठलाची मूर्ती असलेली दिसली. याशिवाय सोनेरी रंगाच्या पादुका पाहायला मिळाल्या. सूरज या भेटवस्तूचा प्रेमाने स्वीकार करतो. केदार आणि सूरज यांच्या या भेटीचा व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल झालाय. अनेकांनी "केदार शिंदे सर असंच लक्ष राहु द्या पोरावर", "आयुष्यात फक्त चांगली संगत महत्वाची असते ती तुला आत्ता लाभली भावा असाच पुढे जात रहा", अशा कमेंट करुन सर्वांनी सूरज आणि केदार शिंदेंचं कौतुक केलंय. केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीच्या फिनालेला सूरजवर 'झापुकझुपुक' सिनेमा काढणार असल्याचं सांगितलं.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शरद पवारांच्या मध्यस्थीने अखेर काँग्रेस-शिवसेनेत हातमिळवणी
पुढील बातमी
हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणं वेळीच ओळखा सावध व्हा!

संबंधित बातम्या