सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून लोखंडी अँगलने मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हा प्रकार दि. 27 रोजी एमआयडीसी येथे घडला. अनिल संपत सावाळे (वय 38, रा. माने कॉलनी, एम.आय.डी.सी. कोडेली, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, पंकज गंगाराम जाधव (रा. कोडोली, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक गोसावी तपास करत आहेत.
जुन्या भांडणाच्या कारणातून एकास मारहाण
by Team Satara Today | published on : 28 December 2024