अँपल कंपनीची बनावट ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या सातारा शहरातील चार दुकानदारांविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 04 February 2026


सातारा   : सातारा शहरातील शाहू स्टेडियम तसेच एसटी स्टँड समोरील मोबाईलच्या दुकानात अँपल कंपनीची बनावट ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या ४ दुकानदारांविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एकूण १८ लाख ९५ हजार ५०० रुपये किमतीचा बनावट साठा जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मोबाईल ॲक्सेसरीज चा बनावट माल उत्पादन करून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना समजल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी शाहू स्टेडियम आणि एसटी स्टँड परिसरातील मोबाईल ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या दुकानांवर छापा टाकला.यावेळी त्यांच्याकडे अँपल कंपनीकडील कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसताना अँपल कंपनीचे चार्जर, अडँप्टर, चार्जर केबल, एअरपॅड, मोबाईल बॅक कव्हर, बॅक पॅनल, बॅटरी स्ट्रीप, कॅमेरा लेन्स इत्यादी अँपल कंपनीचे उत्पादनाचे हुबेहूब नक्कल रंगसंगती असलेली बनावट आर्टिस्टिक अँपल लोगो असलेली व कोणतेही मालकी हक्काचा कायदेशीर अधिकार नसलेली एकूण १८ लाख ९५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमालाचा साठा करून होलसेल आणि किरकोळ स्वरूपात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करताना पोलिसांना आढळून आले. 

याप्रकरणी रोहित अशोक चोरगे (वय ३०, रा. खिंडवाडी, सातारा) अजित रघुनाथ साबळे (वय ३३), दिनेश भगवानराम माळी (वय ४०, रा. भुरके कॉलनी, सदर बाजार सातारा) दिनेश कुमार चौधरी (वय ३३ ,रा. शाहूपुरी सातारा) यांच्या विरोधात कुंदन गुलाबराव बेलोशी (वय ३८, रा. कल्याण पूर्ण, मुंबई) यांनी फिर्याद दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गोडोली शाहूनगर येथून बांधकामाच्या साहित्याची चोरी; सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
पुढील बातमी
गटई कामगारांनी पत्र्याच्या स्टॉलसाठी अर्ज करा - समाज कल्याण सहाय्यक आयक्त सुनिल जाधव

संबंधित बातम्या