बेजबाबदारपणे वाहन चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 02 May 2025


सातारा :  बेजबाबदारपणे ट्रक चालवून दुचाकी दुचाकीस्वाराला धडक दिल्या प्रकरणी, नसरुद्दीन चांद पाशा वय 35 रा. गोलचौकी गल्ली, तालुका बसवकल्याण, जिल्हा बिदर, राज्य कर्नाटक याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

या अपघातामध्ये तेजस चंद्रकांत गाढवे वय- 38 वर्षे, रा. बोपर्डी, तालुका वाई सध्या रा. सातारा हा इसम अपघातात जखमी झाला आहे. दि. 28 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता सातारा-रहिमतपूर मार्गावर गाढवे आपल्या बुलेट दुचाकीवरून जात असताना, येथील कृष्णा वजन काट्या समोर ट्रकचालक नसरुद्दीन पाशा याने ट्रक वेगात चालून बुलेट ला धडक दिली. या अपघातात तुषार साळुंखे यांच्या डोक्याला आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस हवालदार यादव अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तामजाई नगर येथे युवकाची आत्महत्या
पुढील बातमी
महापर्यटन उत्सवात मॉर्निंग रागाज, सायक्लथाॅन, फन रन मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

संबंधित बातम्या