11:33pm | Sep 02, 2024 |
फलटण : फलटण शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचे अपहरण करत मारहाण करून त्याच्याकडून चार लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणार्या एका महिलेसह सातजणांच्या टोळीला फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
उमेश संजय खोमणे (वय 28 वर्ष, रा. खराडेवाडी, ता. फलटण, जि. सातारा), गणेश बाळु मदने (वय 19 वर्ष, रा. पाचसर्कल, खामगाव, ता. फलटण, जि. सातारा), कुमार उर्फ बोक्या लक्ष्मण शिंदे (वय 28 वर्ष, रा. भाडळी खुर्द, ता. फलटण, जि. सातारा), जयराज उर्फ स्वागत आनंदराव चव्हाण (वय 26 वर्ष, रा. झिरपवाडी, ता. फलटण, जि. सातारा), आकाश काशिनाथ डांगे (वय 30 वर्ष, रा. भाडळी बु, ता. फलटण, जि. सातारा) माया (टोपण नाव) वय 30 वर्ष, अनिल गजरे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सजल विलास दोशी (वय 37 वर्ष, व्यवसाय हॉटेल, रा. न्यु भारत साडी सेंटरसमोर, रविवार पेठ, ता. फलटण, जि. सातारा) यांनी दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली होती. त्यात म्हटले आहे की, फिर्यादी दोशी यांचे फलटण शहरामध्ये ‘चॉईस’ या नावाचे हॉटेल आहे. मागील चार महिन्यापासून त्यांच्या हॉटेलमध्ये एक महिला अधून-मधून जेवणाचे पार्सल नेण्यासाठी येत होती. त्या महिलेचा मोबाईल क्रमांक फिर्यादी यांच्याकडे होता. ती तिचे नाव ‘माया’ असे सांगत होती.
संशयित आरोपी महिला व फिर्यादी यांची ओळख झाल्यानंतर दि. 30 ऑगस्ट रोजी यातील तक्रारदार यांच्यासोबत ती फिरायला जाण्यासाठी तयार झाली. फिर्यादी यांनी संशयित आरोपी महिलेला दि. 30 ऑगस्ट रोजी सुरवडी येथून दुचाकीवर घेतले. त्यानंतर त्यांनी लोणंद, वीरधरण या ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर एक सुरक्षित लॉज शोधत होते. परंतु त्यांना सुरक्षित लॉज न मिळाल्याने ते परत येत असताना त्यांना काळज-बडेखान जवळ दोन जणांनी अडवून, ‘आमच्या बहिणीला घेऊन कुठे घेऊन फिरता’, असे म्हणून फिर्यादी सजल दोशी यांना मारहाण करत रस्त्याच्या बाजूला घेऊन गेले. त्यावेळेस महिलाही त्या ठिकाणावरून निघून गेली. त्यानंतर फिर्यादी सजल दोशी यांना मारहाण करून रात्री अकरा वाजेपर्यंत तिघेजण दोशी यांना बलात्काराची केस दाखल करणार असल्याची धमकी देत होते.
तेव्हा फिर्यादी सजल विलास दोशी यांच्याकडून बळजबरीने त्यांनी फोन पे द्वारे 26 हजार रुपये घेतले व फिर्यादी यांना उद्या आणखी 4 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. आला नाही तर फिर्यादी सजल विलास दोशी याचे नग्न काढलेले व बलात्कार केल्याबाबत वदवून घेतेलेल व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली.
याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता शहरामधील रेकॉर्डवरील सात संशयितांना अटक करण्यात आली. हे गुन्हेगार महिलेच्या मदतीने फिर्यादी सजल विलास दोशी यास लुटत होते व काही लोक हे मोबाईलद्वारे इतर आरोपींच्या संपर्कात राहून आरोपीला हनीट्रॅपमध्ये अडकवून सुव्यवस्थितपणे कट करून फिर्यादी कडून पैसे काढत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व पोलिसांनी बारा तासांत संशयितांच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने हे करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक निरीक्षक विशाल वायकर, शिवाजी जायपत्रे, उपनिरीक्षक गोपाल बदने, मच्छिंद्र पाटील, अमंलदार नितीन चतुरे, वैभव सूर्यवंशी, श्रीनाथ कदम, संदीप मदने, अमोल जगदाळे, श्रीकांत खरात, हनुमंत दडस, रशिदा पठाण यांनी केली.
या टोळीने फलटण व लोणंद या भागात सुद्धा अनेक लोकांना यापूर्वी हनी ट्रॅपमध्ये अडकवलेले असण्याची शक्यता आहे. अशा लोकांनी आपल्या संबंधित पोलीस ठाण्यात किंवा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क करावा.
- सुनील महाडीक, पोलिस निरीक्षक, फलटण ग्रामीण पोलिस स्टेशन.
आनेवाडी टोलनाक्यावर लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू |
शिवसेना उबाठा गटाचे जीवन प्राधिकरण कार्यालयात आंदोलन |
शाहूनगरच्या नागरिकांचा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव |
सातारच्या खेळाडूंची राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड |
सातारा मेगा फूड पार्क येथे २० सप्टेंबर रोजी अप्रेन्टिस योजना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
कराडात पोलीस-गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने |
आमदार शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्व विद्यमान आमदारांचे भवितव्य धोक्यात : हेमंत पाटील |
मस्त्य व्यवसायासाठी ठेक्याने द्यावयाच्या १०९ पाझर तलावांसाठी जाहीर लिलाव |
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई येथे संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न |
परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा |