सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास प्रकाश राजेंद्र मोहिते रा. बाबर कॉलनी, करंजे, सातारा यांना उसने पैसे न दिल्याच्या कारणावरून अशोक नारायण मोहिते रा. नागठाणे, ता. सातारा आणि त्यांच्या सोबत असलेला एकजण यांनी मारहाण केली. अधिक तपास महिला पोलीस हवालदार करपे करीत आहेत.