पाटण येथे तिरंगा रॅली संपन्न

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मानले भारतीय सैन्य दलाचे आभार

by Team Satara Today | published on : 21 May 2025


सातारा : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादांची ठिकाणे उद्धवस्त केली. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदल उत्तर देवू शकतो हे जगाला दाखवून दिले, असे सांगून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भारतीय सैन्यदलाबद्दल आभार व्यक्त केले.

पालकमंत्री श्री. देसाई यांच्या उपस्थितीत पाटण येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक व नागरिक यांनी तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

देशातील जनता ही भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी आहे. भारतीय सिमेचे रक्षण आपले सैन्यदल करीत आहे. त्यांच्या शौर्यामुळे आपण सुरक्षीत आहोत, असेही पालकमंत्री  देसाई यांनी तिरंगा रॅली  प्रसंगी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुलावरील आरोपा नंतर आईने लावून घेतला गळफास
पुढील बातमी
राज्यात पुढील 48 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

संबंधित बातम्या