सातारा, दि. 15 : माहुली येथील सातारा रेल्वे स्थानकावर हिंदी दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेल्वे अधिकारी तसेच सातार्यातील कवींच्या संमेलनात वैविध्यपूर्ण, आशयघन कवितांचे सादरीकरण झाले.
सातारा स्टेशन राजभाषा समितीचे रवीचंद्र कुमार, राजेश मानकर, राजकुमार साळवे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हिंदी भाषा ही वेगळा गोडवा असलेली भाषा असून देशभर हिंदी भाषेचा उपयोग केला जातो. या हिंदी दिवसानिमित्त सातारा रेल्वे स्थानकात रेल्वेच्या कर्मचार्यांच्या मुलांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरवण्यात आले.
प्रख्यात कार्यक्रम संयोजक राहूल किर्तीकर यांची यावेळी उपस्थिती होती. त्यांनी रेल्वे स्थानकावर आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक केले.
यावेळी आयोजित कवी संमेलनात कुमार गुमल, अनिल मोहिते, नितीन साळुंखे, राजकुमार साळवे, राजेश मानकर आदी कवींनी कविता सादरीकरण केले. यावेळी सादर झालेल्या कवितांचा आनंद उपस्थितांनी घेतला. श्याम ढोके यांनी सूत्रसंचालन केले.