सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ मध्ये ज्या उमेदवारांना निवडणूक लढविण्याकरिता नामनिर्देशन अर्ज सादर करावयाचा आहे, अशा उमेदवारांनी पोलीस चारित्र्य पडताळणीकरिता महा-ई सेवा केंद्रातून pcs.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरुन आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावेत, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.
अर्ज सादर केल्यानंतर आपण वास्तव्यास असलेल्या हद्दीतील संबंधित पोलीस ठाणे या ठिकाणी चारित्र्य पडताळणीकरिता आवश्यक असलेली कागदपत्र व माहिती देण्यात यावी तद्नंतर आपले पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची प्रत आपले नजिकच्या महा-ई सेवा केंद्रातून काढनू घ्यावी, असेही पोलीस विभागाकडून कळविण्यात आले आहे.