कराड येथील पुलाच्या कामात जिवीत व वित्तहानी नाही

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा खुलासा

by Team Satara Today | published on : 21 March 2025


सातारा :  कराड येथील सहापदरीकरण पुलाच्या सेगमेंटचे काम 15 मार्च रोजी सुरु होतो. यावेळी कामाप्रसंगी कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्त हानी झालेली नाही, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.एस. कदम यांनी दिली आहे.

 कागल सातारा सेक्शन मधील सहा पदरीकरणाचे कामे प्रगतीत असून ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. कराड येथे six lane elevated flyover on single pier (एकूण लांबी ३.४७ कि.मी.) पुलाचे बांधकाम सुरु असून एकूण ९१ स्पॅन पैकी ८२ स्पॅन बसविण्यात आलेले आहेत. ९ स्पॅन बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दि. १५ मार्च रोजी २०२५ रोजी या पुलावर उर्वरीत स्पॅन बसविताना पुलासाठीचे स्पॅन P85-P86 साठी सेगमेंट उभारणी करण्याचे काम सुरु होते. सेगमेंट बसविण्याचे काम सुरु असताना लॉंचरमध्ये तांत्रीक बिघाड झाल्याने सेगमेंट जमीनीवर लाकडी ओंडका (Wooden plank) वर ठेवण्यात आला होता. परंतू सेगमेंटच्या वजनामुळे (अंदाजे १२५ मे. टन, लांबी २९.५ मि. X २.० मि.) लाकडी ओंडका दबला गेला व सदरहू सेगमेंट जमीनीवर थोडा झुकला. यानंतर कोयना नदीवरील ३५० मे. टन  क्रेन मागवून सदरचा सेगमेंट सरळ करण्यात आला व योग्य ते पॅकिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोणतीही जिवीत वा वित हानी झालेली नाही किंवा कोणतेही नुकसान झालेले नाही, अशीही माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कदम यांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटेंची जोडी पुन्हा एकत्र
पुढील बातमी
सातारा बसस्थानकातून सुमारे सव्वा लाखांच्या मंगळसूत्राची चोरी

संबंधित बातम्या