सातारा : डीपीतील 24 हजारांची तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवथर, ता.सातारा येथील डीपीतील तांब्याची तब्बल २४ हजार रुपये किंमतीची तार अज्ञाताने चोरुन नेली. ही घटना दि. २६ ऑक्टोबर रोजी घडली आहे. याप्रकरणी प्रवीण महादेव टोणपे (वय ३६, रा. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.