कराडच्या डॉक्टरची फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगावच्या युवकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 01 February 2026


सातारा  : कराड येथील एका डॉक्टरची फसवणूक केल्याप्रकरणी सचिन विलास चव्हाण, (रा. कोरेगाव, ता. कोरेगाव) याच्याविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. अनिल भगवान देसाई (वय ५९, रा. शनिवार पेठ, कराड) यांनी फिर्याद दिली. चव्हाण याने डॉक्टर देसाई हॉस्पिटलचे वेगवेगळ्या  मेडिक्लेम इन्शुरन्सकडे कॅशलेस फॅसिलिटी सुरु हाण्यासाठी तसेच इतर डॉक्टर मित्रांचा विश्वास संपादन करून  ३ लाख ८२ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. डिसेंबर २०२३ पासून ही फसवणूक झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गेंडामाळनाका परिसरातील सिंथेटिक ट्रॅकचा आता नव्याने प्रस्ताव; नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केली पाहणी; नगरसेवक विश्वतेज बालगुडे व अक्षय जाधव ऍक्टिव्ह मोडवर
पुढील बातमी
खोलीतील पत्र्याच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन संगम माहुलीत वृद्धाची आत्महत्या

संबंधित बातम्या