सातारा : ढकलून एकास जखमी केल्याप्रकरणी दुसर्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील एमआयडीसीतील समर्थ एंटरप्राईजेस कंपनी येथे एकाने ढकलून दिल्याने एक जण जखमी झाला. हा प्रकार दि. 20 रोजी घडला. याबाबत जखमी संतोष किसन जाधव (वय 49, रा. नवीन कुपर कॉलनी, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, रोहित शिंदे (पत्ता माहिती नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार देशमुख तपास करत आहेत.