सातारा : सातारा-कोरेगाव रोडवर एच. पी.गॅस समोर क्षेत्रमाहुली येथे राहणारे सेवानिवृत्त शिक्षक अण्णा शिवाजी पवार (वय ५९) यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये कंपाउंडच्या पोर्चमध्ये पार्क केलेल्या चार चाकी गाडीची मागील बाजूची काच फोडून ५० हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी अशोक कुंडलिक खाडे आणि राज दशरथ दास (दोघे रा. क्षेत्र माहुली,सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात दि. २ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील संशयितांनी पवार यांच्या गाडीचे पाच वेळा नुकसान करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा; एकाच गाडीची ६ वेळा फोडली काच
by Team Satara Today | published on : 03 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा