महाराष्ट्राच्या मराठी रंगभूमीचा दिग्गज चेहरा आज पद्मश्री या मनाच्या पुरस्काराने गौरवला गेला आहे. मराठी सिनेसृष्टीचे मामा म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हे क्षण संपूर्ण मराठी रंगभूमीसाठी, मराठी सिनेसृष्टीसाठी आणि मराठी प्रेक्षकांसाठी अतिशय अभिमानाचे क्षण आहे. अगदी ७०च्या दशकापासून ते आजवर अनेक सिनेमांच्या माध्यमातून अशोक सराफ यांनी मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मराठी रंगभूमीसाठी त्यांचे योगदान फार मोलाचे आहे.
दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना हल्लीच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच Zee चित्र गौरव पुरस्काराने पुरस्कारित करण्यात आले होते. पद्मश्री या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केल्याने संपूर्ण मराठी रंगभूमीची मान उंचावली गेली आहे. जानकी या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर दोन्ही घरचा पाहुणा, जवळ ये लाजू नको तसेच दुनिया करी सलाम’ या काही चित्रपटातून ते महाराष्ट्राच्या घरोघरी पोहचले. पुढे रंगभूमीवर अनेक नाटके केली.
पुढे दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्यासोबत अनेक चित्रपट करत अशोक सराफ यांनी विनोदी अभिनेता म्हणून एक वेगळी ओळख रसिकांच्या मनावर कोरली. त्यांनी आजवर २५० पेक्षा अधिक सिनेमे केले आहेत. अशोक सराफ यांचे हे यश फार मोठे आहे. मराठी सिनेसृष्टीसाठी आणि रंगभूमीसाठी त्यांचे योगदान फार मोठे आहे. अशोक सराफ यांना पद्मश्रीने पुरस्कारित केले म्हणजेच संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचे गौरव करण्यासारखे आहे.
अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ही बातमी शेअर केली आहे. तसेच कॅप्शनमध्ये सगळ्यांचे आभार मानले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार! तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचा प्रेम आणि आशिर्वाद कायम असाच राहू द्या.”