सातारा : एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी रात्री साडेसात ते साडेआठ दरम्यान डबेवाडी तालुका सातारा येथील करण ज्योतीराम चव्हाण यांच्यावर जुन्या भांडणाच्या कारणावरून कोयता व तलवारीने वार केल्याप्रकरणी दादा पवार, साहिल रणदिवे, परशा डायमंड, रोशन आणि एक अनोळखी मुलगा (पूर्ण नाव व पत्ते माहीत नाहीत) यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे करीत आहेत.