सातारा : सदरबझार, सातारा येथे कोयत्याने वार करत तसेच दगडाने मारहाण करुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुश्रीत सावंत, बाब्या, नकल्या (पूर्ण नावे माहित नाहीत) यांच्या विरुध्द मोमीन मुबारक आगा (वय 44, रा.सदरबझार, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 8 जून रोजी घडली आहे. संशयितांनी हल्ल्यात कोयता व दगडाचा वापर केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.