चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्सच्या रस्त्यावर ट्रॅक्टरखाली चिरडल्याने एकचा मृत्यू

चालक फरारी, कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 15 December 2025


कोरेगाव :  चिमणगाव, ता. कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्सच्या रस्त्यावर ट्रॅक्टरखाली चिरडल्याने, एका अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 14) सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात रात्री 11 च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कोरेगाव तालुक्यात ऊस वाहतूक सर्वसामान्यांच्या जीवावर उठल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्सच्या गेट क्र. दोनच्या पाठीमागील नंबरटेकर रस्त्यावर रविवारी (दि. 14) सायंकाळी 7.30 च्या सुमारास हा अपघात झाला. चालकाने ट्रॅक्टर (एमएच-23-बीसी-7909) बेदरकारपणे चालवल्याने, ट्रॅक्टरच्या मागच्या मोठ्या चाकाखाली एक अनोळखी व्यक्ती सापडून, तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने पोलीस ठाण्यात माहिती न देता, घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत कारखान्याचे अधिकारी प्रमोद नारायण कणसे यांनी तक्रार नोंदवली असून, हवालदार विक्रांत लावंड तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा नगरीचे नाव शाहूनगरी असे करावे - विनोद कुलकर्णी
पुढील बातमी
किसन वीर व खंडाळा कारखान्याचा 3350 रुपये ऊस दर

संबंधित बातम्या