सातारा : आकाशवाणी केंद्राजवळ असलेल्या माजगावकर माळ येथून दि ३० रोजी बंद असलेल्या पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील बाजूचा सिमेंटचा दरवाजा अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने फोडून घरामध्ये प्रवेश केला. यामध्ये ४७ हजार ४०० रुपययांचे सोने-चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख रक्कम असे एकूण ६७,४०० रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबतची फिर्याद संगीता अनिल पवार (वय ४५, रा. आकाशवाणी केंद्राजवळ सातारा) यांनी शाहूपुरी पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार घोडके करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
माजगावकर माळ शाहूपुरी येथे घरफोडी; ६७,४०० रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास
by Team Satara Today | published on : 03 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा