अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी; अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांचा निर्णय, १५ हजार दंडाची शिक्षा

by Team Satara Today | published on : 12 December 2025


सातारा  :  अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी वाई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी आरोपीस २० वर्ष सक्त मजूरी व १५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा आज ठोठावली आहे. या कामी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एम. यु. शिंदे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता दयाराम पाटील यांनी काम पाहिले. 

यासंदर्भातील माहिती अशी की, महाबळेश्वर तालुक्यातील आरोपी अहमद ईस्माईल सरफुद्दीन याने २७ जून २०२२ मध्ये येथील एका अल्पवयिन मुलीला फुस लावून पळवून नेले. तसेच तिच्या संमत्तीशिवाय वारंवार अत्याचार केले होते. याबाबत महाबळेश्वर पोलिस ठाण्यात संबंधितांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीविरोधात तपासी अधिकारी पोलिस उपनिरिक्षक अब्दुल बिद्री यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

याबाबतचा खटला वाई न्यायालयाच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर याबाबतची सुनावणी झाली. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, तसेच  अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरिक्षक अब्दुल बिद्री यांनी या कामी कामकाजात सहकार्य केले. आज झालेल्या अंतिम सुनावणीत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदार यांच्या साक्षीवरुन आरोपीस दोषी ठरवून त्याला भा.द. वि. कलम ३७६ (२(एन( , बाल लैंगिक अत्याचार अपराध अधिनियम ४,६, ८, आणि १२ कलमान्वये आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या कामी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एम. यु. शिंदे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता दयाराम पाटील यांनी काम पाहिले. तर त्यांना पैरवी अधिकारी किर्तीकुमार कदम यांनी परिश्रम घेतले. त्यांना प्रॅासिक्युशन स्कॉडचे पोलिस शिपाई सपकाळ, हवालदार भुजंगराव काळे, श्रीमती कदम, शिवाजी पांब्रे, अविनाश डेरे, श्री. नाळे, श्री. कुदळे, सोमनाथ कुंभार यांनी मदत केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मत्यापूर येथे ऊसाच्या शेतात आढळला मृत बिबट्या; सातारा वनविभागाचे पथक घटनास्थळी, शवविच्छेदनानंतर समजणार सत्यस्थिती
पुढील बातमी
करंजे येथे करंजे गणेश कॉलनी परिसरात सेफ्टी दरवाजा तोडून घरफोडी; ३ लाख ७९ हजारांचे दागिने व रोख रक्कम चोरी

संबंधित बातम्या