सातारा : मुलांवर बालवयातच चांगले संस्कार घडत असतात. त्यामुळे प्राथमिक शाळा आणि विद्यालयातील शालेय शिस्तीला फार महत्व आहे. धावडशी ता. सातारा येथील श्री ब्रहमेंद्रस्वामी हायस्कुलमध्ये विध्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर विविध कला, क्रिडा आणि संस्कृतीचे धडे दिले जातात आणि यामुळेच या हायस्कुलमधून सर्वगुणसंपन्न विध्यार्थी घडले जातात, असे प्रतिपादन श्रीमंत छ. रुनालीराजे भोसले यांनी केले.
श्री ब्रहमेंद्रस्वामी हायस्कूल, धावडशी येथे ४२ वा कला महोत्सव व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या फंडातून इमारत नूतनीकरण शुभारंभ समारंभ झाला.यावेळी रुनालीराजे बोलत होत्या. अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यलताताई जाधव उपस्थित होत्या. छ. शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित तसेच विज्ञान व गणिती रांगोळ्या, विविध हस्तकला आणि नवनिर्मित वैज्ञानिक प्रयोगांचे दालन सजविण्यात आले होते. संस्था संस्थापक कै. डॉ. विठ्ठलराव पेंढारकर यांच्या पुतळ्याला अभिवादन व दीपप्रज्वलन, शारदापूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. ईशस्तवन, स्वागतगीत तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुला-मुलींनी सादर केले. तानाजी मालुसरे यांच्यावरील पोवाड्याने संपूर्ण धावडशी गाव व पंचक्रोशीतील प्रेक्षकांची मने जिंकली.
रुनालीराजे म्हणाल्या, धावडशी सारख्या ग्रामीण भागात एवढी सुसज्ज इमारत व प्रत्येक डिजिटल व वर्गातील मोठे स्मार्ट बोर्ड पाहून मन प्रसन्न झाले. धावडशीचे छत्रपतींच्या घरण्यावर असलेलले प्रेम हे ऐतिहासिक आहे; हे असेच वृद्धिंगत होत रहावो. लताताई जाधव म्हणाल्या, मुलांच्या व शिक्षकांच्या कलागुणांचे कौतुक आहे. शाळेच्या भौतिक व बौद्धिक गुणवत्तेचा चढता आलेख संस्था विश्वस्त डॉ. गिरीश पेंढारकर यांनी व्यक्त केला. संस्था सचिव प्रभाकर (आपा) पवार यांनी सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करून श्रीमंत छत्रपतींच्या घराण्याचे असेच प्रेम धावडशीवर व पंचक्रोशीवर राहावे या सदिच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व शालामाऊलीचा वार्षिक इतिवृत्तांत शालाप्रमुख सुनिल चौधरी यांनी व्यक्त केला. संस्थेवर अतोनात प्रेम असणाऱ्या थोर देणगीदारांकडून प्राप्त पारितोषिकांचे वितरण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख शंकर र. कोरे व प्रफुल्लता बकरे यांनी सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन बाळासाहेब साळुंखे, धावडशीचे सरपंच अरुण कारंडे, ग्रामपंचायत सदस्य, संस्थेचे विश्वस्त रामचंद्र तुकाराम पवार, जेष्ठ संचालक गणपत मारुती पवार, दिलीप बाळकृष्ण पवार, सुभाष रामचंद्र पवार, आण्णासो बबन पवार, भिकाजी परशुराम पवार, अशोक विठोबा कापसे, शिवाजी खाशाबा सपकाळ, तानाजी दत्तू मस्के, हिरालाल श्रीरंग पवार, महेश गगन कोकीळ, नेले गावाचे सरपंच सौ. कांबळे ताई व सर्व सदस्य, पिंपळवाडी गावाचे सरपंच सौ. मेणकरताई व सर्व सदस्य, आकले गावाचे सरपंच घागरे व सर्व सदस्य, किडगावचे सुरेशराव टिळेकर तसेच शाळेतील विविध समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठीत नागरिक व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.