शिवतीर्थावर शिवभक्तांचे आत्मक्लेष उपोषण

तिथीवर शिवप्रताप दिन साजरा करणाऱ्या प्रशासनाचा निषेध

by Team Satara Today | published on : 08 December 2024


सातारा : शिवप्रताप दिन तिथीवर साजरा करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा शिवभक्तांनी शिवतीर्थावर रविवारी शिवभक्तांनी आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनाचे पोस्टर छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात झळकविण्यात आले. शिवभक्त ऋषिकेश गायकवाड यांच्यासह त्यांचे सहकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

गायकवाड या आंदोलनाविषयी बोलताना म्हणाले, 10 नोव्हेंबर 1659 रोजी किल्ले प्रतापगडावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला अफजल खान व शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी वध हा शिवरायांच्या ऐतिहासिक कार्याचा मानबिंदू आहे अर्थात शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो..

पण सातारा जिल्हा प्रशासन मात्र तिथीनुसार शिवप्रताप दिन साजरा करते. वास्तविक पाहता दहा नोव्हेंबर रोजी शिवाजी महाराज व अफजलखान यांची भेट झाली होती. हा इतिहास असतानाही सातारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शिवप्रताप दिना तिथीनुसार साजरा केला जातो. याविषयी वारंवार निवेदन देऊनही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केला जाणारा शिवप्रताप दिन हा तिथीनुसार न करता तारखेनुसार करावा. तरीही जिल्हा प्रशासन मात्र तिथीनुसार शिवप्रताप दिन साजरा करते. त्याच्या निषेधार्थ आज सातारा येथील पोवई नाक्यावर शिवतीर्थावर शिवप्रेमींकडून माफ करा शिवबा राजे, म्हणत आत्मक्लेष उपोषण करण्यात आले. यामध्ये ऋषिकेश गायकवाड, वैभव शिंदे, महेंद्र साठे, विक्रम गायकवाड, अशोक पवार, विष्णू आवारे, लक्ष्मण पोळ, अविनाश तुपे असे कार्यकर्ते उपस्थित होते.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राष्ट्रीय स्लिंगशाॅट स्पर्धेत राहुल शिवनामे यांना रौप्य पदक
पुढील बातमी
सिव्हिल हॉस्पिटल येथे क्षयरोग मोहिमेचे उद्घाटन

संबंधित बातम्या