04:25pm | Nov 06, 2024 |
सातारा : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथील राष्ट्रवादी भावनांमध्ये आठ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि उपस्थित कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेतली. या दौऱ्यामध्ये जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना टाळले, मात्र मित्र पक्षांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी युती धर्माची निश्चित आठवण केली जाईल असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
यावेळी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, सरचिटणीस राजकुमार पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई, काँग्रेसचे विराज शिंदे वेगवेगळ्या तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते सकाळी साडेअकरा वाजल्यापासून जयंत पाटील यांनी साताऱ्यात तळ दिला होता. सातारा, वाई, कराड उत्तर, कराड दक्षिण, मान, कोरेगाव, फलटण या मतदारसंघातील वेगवेगळ्या कार्यकर्त्यांशी त्यांनी सुमारे अर्धा तास मतदारसंघनिहाय चर्चा केली. प्रत्यक्ष प्रचारांमध्ये उमेदवारांना कोणत्या अडचणी येत आहेत, किंवा प्रचार पातळीवर कोणत्या सुविधांचा विस्तार होणे गरजेचे आहे याची त्यांनी कार्यकर्त्यांची चर्चा करून माहिती घेतली.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्या मध्ये महाविकास आघाडीच्या मोठ्या प्रचार सभा होणार आहेत. राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 56 सभांचे नियोजन झाले आहे. त्या सभांच्या नियोजनाची सुद्धा तयारीचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला या संवादा दरम्यान आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी भवनामध्ये तातडीने दाखल झाले, त्यांनी दहा मिनिटे जयंत पाटील यांच्याशी कमरा बंद चर्चा केली तसेच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याशी संवाद साधला.
सुमारे दीड तासाच्या आढाव्यानंतर जयंत पाटील जाण्यासाठी निघाले असता पत्रकारांनी त्यांना वाटेत छेडले व महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साताऱ्यात प्रचारासाठी घटक पक्षांकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केली. यावेळी ते म्हणाले महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष एकत्र आहेत प्रचारादरम्यान काही किरकोळ संवाद विसंवादाच्या गोष्टी होतात, त्या संदर्भात जिल्हाध्यक्षांना योग्य ती सूचना केली जाईल आणि घटक पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना सुद्धा याबाबतच्या सूचना केल्या जातील असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य न करता नोटाला मतदान करण्याची जाहीर भूमिका घेतली. यासंदर्भात जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले याबाबत जिल्हाध्यक्ष त्यांचीशी चर्चा करतील, पवार यांची नाराजी दूर करण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |