सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूकप्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

by Team Satara Today | published on : 18 March 2026


सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या पार्थ अनिल काटे (वय १९ अमरलक्ष्मी स्टॉप देगाव सातारा) यांच्यावर कारवाई करत ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल ५,१५,९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, व उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दि. १७ मार्च २०२६ रोजी डी.बी. पथक पेट्रोलिंग करत असताना सातारा शहरातील एम.आय.डी.सी. परिसरातील फुलोरा हॉटेल परिसरात एका चारचाकी वाहनातून बेकायदेशीर दारू वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता, वाहनाच्या डिकीत विदेशी दारूचे दोन बॉक्स आढळून आले. या कारवाईत १५,९४० रुपये किमतीची दारू व वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण ५,१५,९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे पोलीस निरीक्षक सुधीर मोरे व त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सभापतीपद ओबीसीसाठी राखीव असताना गैर-ओबीसी व्यक्तीची निवड - प्रा. लक्ष्मण हाके यांचा आरोप; ओबीसी समाज आक्रमक, 24 मार्च रोजी फलटणमध्ये मोर्चा
पुढील बातमी
कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे दौलतनगर येथे आयोजन; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; साहसी क्रीडा प्रकाराचे मुख्य आकर्षण

संबंधित बातम्या