सातारा : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यामध्ये नमो युवा मॅरेथॉन रन दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे. या तयारीचा भाग म्हणून येथील शाहू स्टेडियम मध्ये मॅरेथॉन एक्सपोचे उद्घाटन लोकसभा संयोजक सुनील काटकर व माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले
या एक्सपोर्टच्या निमित्ताने सातारा हिल मॅरेथॉन चे संयोजक उपेंद्र पंडित पदाधिकारी डॉ. संदीप काटे, ऍड. कमलेश पिसाळ तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे, प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य काका धुमाळ भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण, भारतीय जनता युवा मोर्चाचे चिन्मय कुलकर्णी माजी शहराध्यक्ष विकास गोसावी अविनाश चिखलीक रइत्यादी यावेळी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रसार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने साताऱ्यात नमो युवामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे ही मॅरेथॉन रविवारी (दि. २१ रोजी )सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार दोशीयांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या मॅरेथॉनमध्ये सुमारे 500 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे ही स्पर्धा पोलीस कवायत मैदान तेथून पोवई नाका तेथून राजपथमार्गे गोलबाग मधल्या रस्त्याने पोलीस मुख्यालय मार्गे पुन्हा शिवतीर्थ पोवई नाका व तेथून पोलीस कवायत मैदानावर समाप्त होणार आहे.
या स्पर्धेला भाजपचे दोन्हीही कॅबिनेट मंत्री फ्लाग ऑफ करणार आहेत. नशा मुक्त भारत या अंतर्गत एका रचनात्मक पिढीचे निर्माण करणे आणि केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रसार प्रचार करणे या दृष्टीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोकसभा संयोजक सुनील काटकर यांनी दिली आहे .या स्पर्धेला सर्वसाधारण रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून चिअरअप करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
या तयारीचा भाग म्हणून ऑटो एक्सपोचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत शाहू स्टेडियम मध्ये करण्यात आले. येथे स्पर्धकांना द्यावयाचे स्टिकर टी-शर्ट तसेच प्रथमोपचार सेवा इतर अनुषंगिक तयारीच्या गोष्टी यांचा आढावा जिल्हा भाजप युवा मोर्चा कार्यकारिणीच्यावतीने घेण्यात आला. ऑटो एक्सपो मोहिमेला भारतीय जनता पार्टीच्या सर्व बूथ मंडल केंद्र प्रदेश पदाधिकाऱ्यांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. मॅरेथॉन मार्गदर्शक उपेंद्र पंडित यांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.